श्री क्षेत्र आळे येथील रेडा समाधी मंदिराच्या पायीवारी दिंडीचे प्रस्थान

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१६ नोव्हेंबर २०२२

आळेफाटा


श्री क्षेत्र आळे येथील वेद बोलविलेल्या रेडा समाधी मंदिराच्या पायीवारी दिंडी सोहळ्याचे कार्तिकी वारी साठी आळंदीकडे नुकतेच प्रस्थान करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांणी वेद बोलविलेल्या रेडा समाधी आळे (ता.जुन्नर) या ठिकाणी असुन गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून दरवर्षी श्री क्षेत्र आळे ते श्री क्षेत्र आळंदी कार्तिकी वारी निघत असते. या वर्षी अतीशय उत्साहात हा दिंडी सोहळा पार पडत आज मंगळवार दि.१५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रस्थानाची महापुजा आळे गावचे सरपंच प्रितम काळे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष धनंजय काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्थान करण्यात आले.

या प्रसंगी उपाध्यक्ष संजय शिंदे, खजिनदार म्हतुजी सहाने सचिव अविनाश कु-हाडे, चारूदत्त साबळे , संतोष पाडेकर, संजय खंडागळे,व्यवस्थापक कान्हु पाटील कु-हाडे,विलास शिरतर,बाळासाहेब शेळके,गिरीश कोकणे,अँड. सुदर्शन भुजबळ, गोरक्ष गुंजाळ,बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे,ज्ञानदेव सहाने, बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर, माधव टकले, तसेच पालखी सोहळ्याचे कार्याध्यक्ष बाजीराव निमसे, उपाध्यक्ष नागेश कु-हाडे,सखाराम कु-हाडे, पाडुरंग गाढवे, भगवान सहाने, संजय कु-हाडे आदी मान्यंवर ग्रामस्थ, तसेच वारकरी उपस्थित होते. तसेच या पालखीच्या रथाला बैल बबन धोंडीभाऊ जठार यांची होती.दरम्यान हा दिंडी सोहळा आळे, नारायणगाव ,पेठ, चाकण मार्गे आळंदीला दि.१९ रोजी पोचणार आहे .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *