कोणाचाच दसरा मेळावा पाहिला नाही – अमित ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


बुधवारी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केली होती. दोन्ही बाजूंच्या नेत्यानी एकमेकांवर टीका केली मात्र, या दोन्हींपैकी कोणाचा दसरा मेळावा पाहिला यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पाहिला, असे अमित ठाकरेंना विचारण्यात आले त्यावर “कोणाचाच दसरा मेळावा पाहिला नाही,” असे उत्तर अमित ठाकरे यांनी दिलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *