अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी

३० डिसेंबर २०२२

नागपूर


महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला. मात्र दररोज चोख प्रत्युत्तर देणाऱ्या सत्ताधारी आमदारांमध्ये आज शुकशुकाट दिसून आला. महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे, राज्यपाल झाले भाज्यपाल, राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा, चोर है चोर है राज्यपाल चोर है. अशा घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिल्या.

आंदोलकांनी हातात संघाच्या काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे त्वरीत हाकला, अशी जोरदार मागणी केली. तसेच शेतकरी जसे शेतात बुजगावणे उभारतात तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी जोरदार आंदोलन करत सत्ताधाऱ्यांनाघेरण्याचा प्रयत्न केला. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दोन बुजगावणे आहेत. यांच्यासमोर गायरान खाल्ली जात आहे, भूखंड चोरले जात आहेत, महापुरुषांचा अपमान केला जात असून हे बुजगावणेरुपी सरकार गप्प बसलंय, अशी टीका यावेळी विरोधकांनी केली.

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व आमदारांचा सहभाग होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *