नवरात्रात खरेदीला उधाण; शहराचे चक्र गतिमान होणार

पिंपरी प्रतिनिधी
२९ सप्टेंबर २०२२


यंदाचा नवरात्रोत्सव जल्लोष , उत्साह आणि धूमधडाक्यात साजरा होणार आहे . नवरात्रोत्सवाच्या उत्सव निमित्ताने बाजारपेठा सज्ज झाल्या असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढली आहे . यंदाचा उत्सव हा निर्बंधमुक्त असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे . दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना मनसोक्त खरेदी करता यावी , यासाठी शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत . दसऱ्यानिमित्त अनेक विक्रेत्यांनी खास सवलत , मोफत भेटवस्तूंची घोषणा केली आहे .

यंदा दसऱ्याला नव्या कपड्यांबरोबरच ,वाहने , इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याचा अंदाज असून , सोन्या – चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहक भर देण्याची शक्यता आहे . इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही यंदा मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे. मोबाइल , लॅपटॉप , वॉशिंग मशीन स्मार्ट टीव्ही , फ्रिज , स्मार्ट वॉच , म्युझिक सिस्टीम , कॅराओके , ओव्हन यांना चांगली मागणी आहे . त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी झिरो डाऊन पेमेंट , ईएमआय , शून्य टक्केव्याजासह कर्ज आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत . मोबाइलमध्ये ५ जी मधील अपग्रेड मॉडेलला मागणी वाढली आहे . शहरातील पिंपरी मार्केट , भोसरी , चिंचवड येथील बाजारपेठांत विविध ऑफर्स दिल्या जात आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *