आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.2 /6/2021
बेल्ह्यात बिबट्या देतोय भरदिवसा दर्शन, नागरिक भयभीत
बातमी:विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर
बेल्हे (ता.जुन्नर) येथील शिंदे मळ्यात व वेताळ बाबा मंदिर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार करताना नागरिकांना दिसत आहे. भर दुपारी,सायंकाळी सहजपणे बिबट्याचं दर्शन होवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे. या भागात वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वनविभागानं या कडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण जनावरांचा चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याची भेट ठरलेलीच आहे, जर कधी भुकेनं व्याकूळ झालेला बिबट्या न जाणो माणसांवर हल्ला करू शकतो. तरी सदर परीसरातील बिबट्याची दहशत वन खात्याने ऒळखून योग्या त्या उपाययोजना कराव्यात ही विनंती ग्रामपंचायत सदस्या निकिता शिंदे, भास्कर शिंदे, विजय शिंदे, रामदास शिंदे आदी नागरिकांनी केली आहे.