अखेर दहा तासांनी धावला महामार्ग

पिंपरी प्रतिनिधी
०३ ऑक्टोबर २०२२


मुंबई – बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर वाकड येथून आठ तासांत वाहतूक खुली करण्यात आली वाकड येथून रविवारी सकाळी साडेआठपासून चांदणी चौकाकडे वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्यात आली . त्यानंतर एका तासात येथील वाहतूक सुरळीत झाली शनिवारी रात्री अकरापासून वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे निपचित पडलेला हा महामार्ग दहा तासांनंतर रविवारी सकाळी नऊपासून नियोजन पुन्हा धावला . चांदणी चौकातील फूल पाडण्यासाठी पिंपरी – चिंचवड वाहतूक पोलिसांकडून विशेष करण्यात आले होते.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका ते मुंबई बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौक यादरम्यान ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता . पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , अपर आयुक्त डॉ . संजय शिंदे , पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक बदल करून त्याची अंमलबजावणी करण्यात आली . रुग्णवाहिकांसाठी दिला रस्ता मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर उर्से टोल नाका येथे रविवारी रात्री एक ते तीन या कालावधीत वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या . यातील प्रवासी वाहनांना प्राधान्य देत तत्काळ पर्यायी मार्गावर सोडण्यात आले . तसेच यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या पाच रुग्णवाहिकांनादेखील पोलिसांनी वाहतूक कोंडीतून रस्ता करून दिला . त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *