राजेश पाटील यांची सैनिकी कल्याण विभाग संचालक पदी नियुक्ती

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०३ ऑक्टोबर २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त राजेश पाटील यांची राज्य शासनाने पुण्यात सैनिक कल्याण विभागाचे संचालक पदी नियुक्ती केली.

ओडिशा वरून पिंपरी चिंचवड चे आयुक्त म्हणून राजेश पाटील यांची श्रावण हर्डीकर यांचे जागेवर बदली झाली होती. शांत स्वभावाच्या पाटलांनी अगोदर येथील असलेली परिस्थिती , राजकीय आणि प्रशासकीय वातावरण समजून घेतले. शांतीत क्रांती करून अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन स्वतःची टीम बनवली. सर्वात अगोदर भविष्याचा वेध घेत कोरोना काळात जेम्बो कोविड सेंटर बंद करून पाकिकेचे करोडो रुपये वाचवले. आणि लगेच यशवंतराव रुग्णालयाच्या ताण कमी होण्यासाठी त्याच धर्तीवर पालिकेच्या इमारतींमध्ये भोसरी, थेरगाव, आकुर्डी , पिंपरी यासारख्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल बनवली. तसेच मोहल्ला क्लिनिक वर जोर दिला. त्यानंतर नागरिकांच्या सहभागातून हाती घेतले स्वछता अभियान त्यासाठी वेळेला कठोर निर्णय घेत कुठेही राडारोडा टाकणाऱ्यावर दंडाची रक्कम भरमसाठ वाढवली. असे एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत असताना त्यांच्यावर खुप आरोपही झाले पण त्याची तमा न बाळगता आपले धडाकेबाज कामे सुरू ठेवली.

अनेक वेळा राजकीय नेत्यांची आणि त्यांची खडाजंगीही झाल्याचे पाहायला मिळाले. प्रसंगी अजित पवार यांचे जवळचे अधिकारी राष्ट्रवादी धार्जिणे म्हणून आरोपही झाले. पण त्यांनी आपल्या कामांचा धडाका सुरुच ठेवला. ते करत असताना काही निर्णय पटले नाही तर सर्वपक्षीय नेत्यांच्या रोशालाही समोरे जावे लागले. आयुक्त राजेश पाटील यांच्या बोलण्यातून येत असे की खूप कामे बाकी आहेत त्यांना कमी वेळेत खूप कामे करायची होती म्हणून नियोजन करून ते नेहमी सुट्टीच्या दिवशी शनिवारीही पालिकेत हजर राहत असे. ते हजर राहत असल्याने अधिकारीही हजर राहत असे व कामाचा निपटारा होत असल्याचे पहायला मिळत असे.

अशातच शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे खटकेही उडत असे. आणि त्याचवेळी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि महाविकास आघाडी सरकार पडून त्या जागी शिंदे फडणवीस सरकार आल्याने आयुक्तांची बदली होणार असल्याची शहरात जोरदार चर्चा होती. आणि झालेही तसेच “नवा गडी नवे राज्य ” याप्रमाणे अखेर कार्यकाळ संपला नसतानाही आणि कामाचा धडाका सुरू असतानाच अचानक १६ ऑगस्ट रोजी तडकाफडकी राज्य शासनाने त्यांची पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली होती. मात्र कौटुंबिक कारणास्तव राजेश पाटील यांनी तेथील पदभार स्वीकारला नव्हता.

गुरुवारी (दि २९ सप्टेंबर) रोजी राज्य शासनाने ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यामध्ये धडाडीचे अधिकारी राजेश पाटील यांची पुण्यातील सैनिक कल्याण विभागाचे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. पण पिंपरी चिंचवडकरांच्या स्मरणात राहणाऱ्या आयुक्तांपैकी एक आयुक्त म्हणून ते स्मरणात नक्कीच राहतील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *