आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे – चंद्रशेखर बावनकुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ सप्टेंबर २०२२


आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांची विधानंही बरीच चर्चेत राहिली होती. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून बावनकुळेंनी त्यावरून सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.

शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळेंच्या या विधानावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.“तो काळ गेला आहे. शरद पवारांचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? स्वत:चं कर्तृत्वही दाखवावं लागेल. शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे. पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो हे पाहिलं जातं. आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे”, असं बावनकुळे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *