नारायणगांव वारूळवाडी येथील द्वारकामाईसाठी खा.डॉ. कोल्हे, आ.बेनके यांच्या वतीने प्रत्येकी १० लाखांचा निधी

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१८ एप्रिल २०२२ 

नारायणगाव


ॐ साई सेवा मंडळ आयोजित साईभक्त भिमाजी पाटील पालखी सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले.या पायी पालखी सोहळ्यात नारायणगाव वारूळवाडी परिसरातील तब्बल ४५० साईभक्त सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्याचे हे २२ वे वर्षे होते. या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी नारायणगाव शहरातून साईबाबांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यात साईबाबांची मूर्ती असलेला चित्ररथ, शिर्डी येथून आलेले साईबाबा तसेच त्यांच्या भक्तांच्या वेशभूषेतील कलाकार तसेच आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे टाळकरी मुले यांचा सहभाग होता.

द्वारकामाई येथे साईंचा विशाल भंडारा व रक्तदान शिबिराचे आयोजन

या पालखी सोहळ्याचा विशाल भंडारा गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी चक्रीपारायण, साईसत्यनारायण महापूजा, तसेच साईभक्त जगदीश पाटील यांचा भजनाचा कार्यक्रम व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तब्बल १८१ जणांनी रक्तदान केले. यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की शिरूर लोकमतदार संघ हा भक्ति आणि शक्तिचा संगम आहे या भक्ति आणि शक्तीच्या संगमामधे द्वारकामाई हे एक भक्तीपीठ म्हणून नक्कीच समोर येईल.

तब्बल १८१ जणांनी केले रक्तदान

डॉ.अमोल कोल्हे यांनी साईमंदिर निर्माणसाठी खासदार फंडातुन १० लक्ष रुपये घोषित केले. तसेच तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनीही उपस्थित राहून आपल्या निधीतून १० लक्ष रुपये जाहीर केले. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे , वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, मंडळाचे अध्यक्ष विनायक रसाळ, उपाध्यक्ष सुजित खैरे, विश्वस्त संजय वारुळे, सुरज वाजगे, रोहिदास केदारी, जयेश कोकणे, श्रीकांत वायाळ आदी मान्यवर तसेच हजारो अबाल वृद्ध महिला भाविक साईभक्त उपस्थित होते. या विशाल भंडारा व कार्यक्रमाचे नियोजन ॐ साई सेवा मंडळातील सर्व सभासद व पदाधिकाऱ्यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *