बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी शिवसेना बैलगाडा मालक यांच्या बाजूने खंबिर्तेने उभी – खासदार संजय राऊत.

मंचर:
भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेला वारंवार अपमानित केले त्या वेदनेतून उडालेल्या ठिणगी मुळे मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळाले. अपमानाची सल होती त्यातून सरकार स्थापन झाले सरकार टिकवताना शिवसेना पक्षाला ताकद मिळाली पाहिजे शिवसैनिकाने अनेक लोकांना पराभूत केले आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात-पात न पाहता शिवसैनिकाला मोठे केले पैशाने निवडणूक जिंकता येत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० खासदार हवे होते.राज्यात वेगळी परिस्थिती असताना आम्ही शस्त्र टाकली असे समजू नका शिवसैनिक लढवय्ये आहेत.

पुढच्या वेळी मी जेव्हा येईल तेव्हा बैलगाडा विषय मार्गी लागलेला असेल. कोर्ट काय म्हणत, कायदा काय म्हणातो यापेक्षा शिवसेना काय म्हणते हे महत्त्वाचं आहे. मेनका गांधीला इथे बोलावून बैलगाडा मालकांची ताकद काय असते ते एकदा दाखवून देऊ असे ठणकावून सांगत शिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आंबेगाव तालुका शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट केले.

मोरया मंगल कार्यालय वडगाव फाटा येथे शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जरी मी खासदार नसलो तरी मी खासदार असताना सरकार दरबारी जेवढी ताकद होती तेवढीच आजही आहे. शिवसेना पक्ष व मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे. त्यामुळे शिवसैनिकांची कामे अडत नाही. विकासकामांसाठी सातत्याने माझे प्रयत्न सुरुच आहेत. त्यामुळे केंद्रीय वर्ग निधीतून ५कोटी रुपये तर ग्रामीण विकास निधी व इतर योजनेतून ३कोटी रुपयांची कामे वर्षभरात मंजूर करून आणली आहे. एका पराभवाने खचून न जाता आपल्याला पुन्हा नव्या ताकतीने उभं राहायचं आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला न्याय देऊन पक्ष देईल ती जबाबदारी व कामे नेटाने पार पाडावीत असे यावेळी आवाहन केले.

शिवसेना उपनेते रवींद्रजी मिर्लेकर यांनी आपल्या तडाखेबाज शैलीने शिवसैनिकांना चेतविले. यावेळी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले व रवींद्र करंजखेले यांनी भाषणातून आपली मते मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *