शिंदेसाहेब जपून राहा; जितेंद्र आव्हाडांनी फेसबूकवर एक पोस्ट टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलं सतर्क

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२


‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड यांना अलीकडेच ठाणे पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी आव्हाडांची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर आव्हाडांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले. माझ्यावर कठोर कारवाई करावी, म्हणून चाणक्याकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता, पोलिसांना फोन केला जात होता, असा आरोप त्यांनी केला.

या आरोपानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आव्हाडांनी उल्लेख केलेला चाणक्य आपणच आहोत, असा त्यांचा माझ्यावर रोख असेल तर मी त्यांचे आभार मानतो. कारण चाणक्य हा राजकारणातला चांगला माणूस होता, असं विधान म्हस्के यांनी केलं आहे.या घडामोडीनंतर जितेंद्र आव्हाडांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतर्क केलं आहे. “चाणक्य नाही शकुनीमामा… शिंदेसाहेब सावध राहा” अशी फेसबूक पोस्ट जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *