सुरेखा नरहरी कापसे यांचे दुःखद निधन

२९ सप्टेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक , कामगार नेते नरहरी (अण्णा) मारुती कापसे यांच्या पत्नी सुरेखा कापसे (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार दि २७ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. मोरवाडी येथे कापसे चाळीत त्यांनी आपले आयुष्य पती मुले आणि कुटुंबियांच्या सेवेत समर्पित केले. त्या सुस्वभावी आणि सुसंस्कृतीत होत्या. त्यांच्या असे अचानक जाण्याने मोरवाडी परिसरात हळहळ वेक्त होत आहे.

त्यांच्या मागे पती, तीन मुले , सुना नातवंडे असा परिवार आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष राजाराम कापसे हे त्यांचे दिर तर सामाजिक कार्यकर्ते निलेश कापसे, उद्योजक अतुल कापसे, कमलेश कापसे ही तीन मुले आहेत.
त्यांची दशक्रिया विधी सोमवार दि ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पिंपरी येथे होणार आहे.

आपला आवाज न्युज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *