जुन्नर तालुका मित्र मंडळ व दिपज्योत मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने कोविड काळात मदतीचा धनादेश…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी दि २० फेब्रुवारी २०२१
जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे,पिंपरी चिंचवड च्या वतीने शिवजयंती दिनी मंडळाच्या वतीने सकाळी लांडेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून जुन्नर तालुक्यातील नारायणगड येथे गडाची वाडी येथे भूगोल फाऊंडेशन, संतनगर मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले.
तसेच पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून येणाऱ्या १९५ रूग्णांना कोविडमध्ये व्हेंटिलेटर बेड,इंजेक्शन ,प्लाजमा व मोफत उपचार मिळवून दिले.तसेच यावेळी हिवरे तर्फे नारायणगाव येथील सौ.वंदना राजगुरू यांना कोविड मदत रिफंडचा धनादेश मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे,खोडद गावचे माजी सरपंच जालिंदरमामा डोंगरे,गडाचीवाडी चे अमोल काळे,पत्रकार अशोक खरात,जुन्नर मित्र मंडळाचे सचिव नवनाथ नलावडे, खजिनदार व दिपज्योत मेडीकल फाऊंडेशनचे दिपक सोनवणे,पत्रकार अशोक खरात यांचे उपस्थितीत भूगोल फाऊंडेशनचे विठ्ठलनाना वाळुंज,साहेबराव गावडे, कर्नल आरबुज, नितीन शिंदे, निखील कुंभार व खोडद, गडाची वाडी व हिवरे तर्फ नारायणगावचे ग्रामस्थ हेही यावेळी उपस्थित होते.यावेळी राजगुरू कुटुंबियांचे वतीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.