कर्मवीर जयंती रयत शिक्षण संस्थेच्या मलठण शाखेत उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
२९ सप्टेंबर २०२२

मलठण (शिरूर)


गोरगरिबांच्या लाखो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना त्यांच्या पायावर भक्कमपणे उभे करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. भाऊराव पायगोंडा पाटील (कर्मवीर अण्णा) यांची जयंती २२ सप्टेंबर रोजी जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये हा जयंती सोहळा महिनाभर साजरा होत असतो. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये, दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व कवठे शाखेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाव्हळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रमुख मनोगतात कर्मवीर अण्णांच्या कार्याची अनेक उदाहरणे देत, कर्मवीरांचा जीवनपट उपस्थितांसमोर आपल्या वाणीतून मांडला. तसेच कार्यक्रमादरम्यान त्यांनी शाळेच्या वॉल कंपाऊंडसाठी देणगी जाहीर करत, उपस्थितांनाही देणगीचे आवाहन केल्याने कार्यक्रमादरम्यान सुमारे लाखभर रूपयांची देणगी जमा झाली. या जयंती कार्यक्रमासाठी रांजणगाव एम आय डी सी मधील ब्रिटानिया कंपनीतील मॅनेजर डॉ शाम लोंढे, टाटा स्टील कंपनीचे जनरल मॅनेजर व्यंकट पंपटवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


डॉ शाम लोंढे, व्यंकट पंपटवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद नरवडे, स्कूल कमिटी सदस्य सुदाम गायकवाड, स्कूल कमिटी सदस्य विलास थोरात, माजी सरपंच सुहास थोरात, सा. कार्यकर्ते संदीप गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते म्हाका कोळपे, उपसरपंच सोनाली दंडवते, माजी सरपंच प्रकाश गायकवाड, सा. कार्यकर्ते नानाभाऊ फुलसुंदर, ग्रा पं सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रामचंद्र गायकवाड, स्कूल कमिटी सदस्य राघाशेठ गायकवाड, सदस्या वैशाली गीते, सदस्य बाळासो. वाव्हळ, ग्रा पं सदस्य पोपट साळवे, केंद्रप्रमुख बोरुडे सर आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाकडून तयार करण्यात आलेल्या अटल टींकरींग लॅब (विज्ञान) व टाटा स्टील कंपनीकडून मिळालेल्या सानीटरी नॅपकिन व डिस्पोजल मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक आर बी शिंगाडे, सुनंदा चौधरी, देवानंद महामुनी, धनश्री ताठे, संदीप इचके, मच्छिंद्र वडेकर, राजरत्न ढसाळ, सचिन कोकरे, भारती चांदणे, सुरेश तीटकारे, दिगंबर उंडे, युवराज मुंढे, अर्चना निगडे, माजेद सय्यद, तर शिक्षकेतर कर्मचारी दादाभाऊ कुरंदळे, गोरक्षनाथ डफळ, संपत धीवर, नवनाथ येवले, तेजस बोडरे या सेवक वर्गाने कार्यक्रम यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जयवंत झेंडे यांनी केले. सुत्रसंचालन सत्यश्री थोरात यांनी केले तर आभार प्र. पर्यवेक्षिका छाया भोगावडे यांनी मानले.

यावेळी शैक्षणिक गुणवत्ता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना व विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्रक देण्यात आली. याचे सूत्रसंचालन शिक्षिका लता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, मलठण व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आजी माजी पदाधिकारी, पेंशनर्स संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *