आंतरशालेय खेळ स्पर्धा विद्यार्थींना प्रेरणादायी – अ‍ॅड.सचिन काळे

चरोलीतील ,काळे कालनीतील किडस पँराडाईस इंटरनँशनल शाळेच्या आंतरशालेय स्पर्धेच्या खेळाच्या वेळी शाळेचे संचालक अँड सचिन काळे यांनी आपल्या भाषणामध्ये खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा सतत प्रयत्न करत आसते,यामुळेच विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता, सहानुभूती, शिस्त व सहकार्याची भावना निर्माण होते आणि मन ही प्रसन्न राहते असे मोलाचे विचार विद्यार्थ्यांना दिले मुलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहिले नाही पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.


संस्थेचे अध्यक्ष अँड अनंत काळे,म्हणाले आमच्या शाळचे विद्यार्थी जिल्हा स्तरावरील स्पर्धेबरोबर राज्य स्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळवतात यापुढे मी शाळेच्या विद्यार्थीना काही ही कमी पडू देणार नाही. सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून खेळत होते अनेक चुरशीचे सामने झाले . या स्पर्धेमध्ये असलेले खेळ डॉज बॉल, रिले, खो-खो, स्लोसायकलिंग ,लंगडी,रस्सीखेच असे दोन गट करून खेळ घेण्यात आले. मुलांचा उत्साह पाहून आम्हाला पण आमच्या शाळेतील जिवन आठवल्याचे जोगदंड यांनी म्हटले आहे. विद्यार्थीच्या चेहर्यावर उत्साह भरभरून दिसत होता.प्रत्येक आपल्या गटाला प्रोत्साहित करत होते. विजयी खेळाडूना पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक काढून मेडल व.प्रमापत्र देण्यात आले.

यावेळी शाळेचे अध्यक्ष अँड अनंत काळे, संचालक अँड सचिन काळे, संचालक नवनाथ काळे, गुणवंत कामगार आण्णा जोगदंड,मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा काळे मॅडम, क्रीडा शिक्षक संदेश साकोरे सर, अभिषेक हजारगे, प्रशांत हराळ सह पालकही उपस्थित होते.
शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेतली होती. स्पर्धेची सांगता शेवटी ‘वंदे मातरम’ने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *