शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या ऑनलाइन करण्याच्या सूचना

पिंपरी प्रतिनिधी
२४ सप्टेंबर २०२२


महापालिकेचे प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रखडलेल्या होत्या, आयुक्तांनी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांस सोबत अखेर गुरुवार दिनांक 22 रोजी बैठक घेतली. त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सप्टेंबर संपत आला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परिणामी एक महिन्यापासून निव्वळ शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची चर्चा रंगली होती, मात्र प्रत्यक्षात बदली होत नव्हती. महापालिका शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादग्रस्त ठरतात 2018 पासून तत्कालीन आयुक्तांनी परिपत्रक काढून प्रशासकीय बदली प्रक्रिया कशी राबवावी यांचा निर्णय दिलेला आहे,पण प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या तीन वर्षापासून निव्वळ बदल्या संदर्भात परिपत्रक काढले जात आहे.प्रत्यक्ष त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

महापालिका आयुक्त, कर्मचाऱ्यांच्या महासंघाच्या बैठकीतील निर्णय

अनेक शाळांमध्ये तीन ते पाच तसेच पंधरा वर्ष झालेल्या शिक्षकांचे मक्तेदारी वाढलेली आहे, त्याचा थेट परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर झाला आहे. सध्या 21 शाळा मुख्याध्यापक विना आहेत. त्यांनाही मुख्याध्यापक मिळत नसल्याचे चित्र आहे तीन वर्षाच्या निकषांनुसार केवळ 30 टक्के बदली पात्र शिक्षकांची संख्या 300 हून अधिक आहे, प्रशासनाने शिक्षकांची यादी तयार करणे आवश्यक आहे. शिक्षक बदलल्याशिवाय शाळा सुधारणार नाहीत ,असा पूर्वानुभव आहे परंतु तीन वर्षापासून बदल्या झाल्या नसल्याने काही शिक्षकांचे चांगलेच फावले आहे. या निकषानुसार तरी बदल्या करायला हव्यात, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *