वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या हानी च्या अनुदान कक्षा वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन

विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

जुन्नर l वन्य प्राण्यांमुळे मानव, पशुधन, पीक हानी अनुदान कक्षा वाढवण्यात यावी यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की वाघ, बिबट्या, गवा, रान डुक्कर,लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर यांच्या हल्ल्यांमुळे व्यक्ती मृत व जखमी झाल्यास तसेच गाय, बैल,बकरी, मेंढी चा मृत्यू झाल्यास अथवा जखमी झाल्यास जनावर मालकास नुकसान भरपाई देण्याची तरतूद सध्या प्रचलित आहे.

याबाबतचा सुधारित शासन निर्णय २८ नोव्हेंबर २०१६ रोजी निर्गमित झाला आहे. तथापि ग्रामीण भागातील शेतकरी स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी कुत्रा व कुटुंबीयांचे उपजीविकेसाठी जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन करतो.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू अथवा जखमी झाल्यास पाळीव कुत्रा व कोंबड्यांची कोणतीही नुकसान शेतकऱ्यांना मिळत नाही. तर यासाठी शासन नुकसान भरपाई मिळणे बाबत सविस्तर योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती पांडुरंग पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *