अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एका गोष्टीचा विचार करावा – शंभूराज देसाई

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२४ सप्टेंबर २०२२


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर कुरघोडी टीका केली जात आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला शंभूराज देसाई यांनी टोला लगावला.

आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत

अजित पवार उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काम केलय. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या दोन खात्यांचा मी राज्यमंत्री होतो. मी अजित पवारांचं काम जवळून पाहिलं आहे. पण अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एकाच गोष्टीचा विचार करावा की हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोत, असं शंभूराज देसाई म्हणाले. तसेच साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला शंभूराज देसाई यांनी केला आहे.हे सरकार लवकरच पडणार अशी वक्व्य करून त्यांच्यासोबतची माणसं थांबवण्याचं काम अजित पवार करत आहेत, असही देसाई म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *