अवघ्या आठ महिन्याचा अल्प कालावधीमध्ये ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज ला मिळाला दुसरा पुरस्कार

नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल स्कूल च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळाली आहे.

जागतिक शिक्षक दिनानिमित्त पाचव्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल समिट २०२० चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. भारत व इतर देशातले शैक्षणिक जगातले तज्ञ आपआपले मत मांडायला व्हर्च्युअली जमले होते. या समिटमध्ये नारायणगाव येथील ब्लूमिंग्डेल स्कूलच्या प्राचार्या उषा मूर्ती यांनीही वक्ता म्हणून आमंत्रित केले होते.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मुलांचा अवघ्या चार वर्षाचा वयापासूनच शैक्षणिक च नव्हे तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा वसा घेऊन काही नाविन्यपूर्ण उपक्रम जसे कम्युनिकेटीव लैंग्वेज प्रोग्रॅम, सर्कल टाइम, फॅमिली सपोर्ट बिल्डींग अॅक्टिविटीज, कल्चरल अॅक्टिविटी, मुलांचा गरजेप्रमाणे व अभ्यासक्रमानुसार पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी उपक्रम प्राचार्या उषा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सुरू करण्यात आले. या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात आला. या सर्व उपक्रमांचे सादरीकरण प्राचार्या उषा मॅडम यांनी विविध व्हिडिओ व प्रेझेंटेशन द्वारे जगासमोर केले. ज्याचे भरभरून कौतुक करण्यात आले व ब्लूमिंगडेल प्री स्कूल ला बेस्ट स्कूल इन इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह टेक्निक इनेटिएटीव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार मिळविण्यात स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांनी विविध उपक्रमांच्या संकल्पनेला उचलून धरले व विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक यांच्यामधील नात्यांना नवी ओळख करून दिली असे उषा मुर्ती यांनी सांगितले.

मुलांचा सर्वांगीण विकास करण्यास नवीन उपक्रम राबवायला संस्थेच्या खजिनदार गौरी अतुल बेनके सदैव साथ देत पाठीशी असतात व त्यांचे सहयोग व पाठींबा मिळाल्यास हे उपक्रम यशस्वीरित्या पार पाडता येतात असेही त्या म्हणाल्या.

आजच्या या covid-19 परिस्थिती मध्ये सुद्धा लाँकडाऊन सुरू झाल्याचा अवघ्या पंधरा दिवसातच मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्वरित व्हर्च्युअल ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा दूरदर्शी निर्णय ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मॅनेजमेंट व प्राचार्यांनी घेतला. आज पर्यंत त्याचे सुरळीत व सफलतापूर्वक नियोजन सुरू आहे. अगदी नर्सरी पासून इयत्ता १२वी पर्यंतचे क्लासेस सुरू करण्याकरिता सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी व पालकांना सुद्धा वेळोवेळी माहिती व गरज पडल्यास ट्रेनिंग सुद्धा देऊन त्यांनाही नवीन ऑनलाइन शिक्षण पद्धती आत्मसात करण्यास ब्लूमिंगडेलचे प्रयत्न व त्यात मिळालेले यश उल्लेखनीय आहे. अशी माहिती प्राचार्य मूर्ती यांनी ग्लोबल समिटमध्ये दिली.

आदर्श विद्यार्थी घडविणे हे ध्येयाचे पुन्हा उच्चारण करत गौरी बेनके यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाच्या सहयोगाचे कौतुक केले. ठरविलेले ध्येय पूर्ण करण्यास शाळा नेहमीच अग्रेसर राहील. शैक्षणिक पद्धतीचे स्वरूप काळानुसार कितीही बदलले तरीही ब्लूमिंगडेल पूर्णपणे हे बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांना योग्य रित्या घडवत राहील असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके यांनी ही ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या या जागतिक पुरस्काराचा उल्लेखनीय सन्मान केला व विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हे ध्यासपूर्ण कार्य संस्था नेहमीच करते असे ही मत त्यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *