जीर्ण झालेली पाण्याची टाकी असून अडचण नसून खोळंबा

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी 
१२ सप्टेंबर २०२२

खामुंडी


नगर कल्याण महामार्गावरील खामुंडी (ता.जुन्नर) हद्दीतील बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची खूप वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली व सद्यस्थितीत अतिशय जीर्ण झालेली पाण्याची टाकी स्थानिक नागरिकांना असून अडचण नसून खोळंबा ठरत असून ती त्वरित हटवावी अशी मागणी खामुंडी येथील प्रगतिशील शेतकरी सचिन रामचंद्र डुंबरे यांनी केली आहे.

धोकादायक टाकी हटविण्याची मागणी

खामुंडी येथील बदगी रोड लगत सचिन रामचंद्र डुंबरे यांच्या दुकानांच्या गाळ्या जवळ व सुरेश भिमाजी रोकडे यांच्या घराजवळ परिसर अभियांत्रिकी विभाग पुणे यांचे नावे असलेल्या जागेत बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा करणारी व अनेक वर्षांपासून पूर्णतः बंद असलेली पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण झालेली आहे, टाकीच्या बाजूलाच रहाते घर व दुकाने देखील आहेत, टाकीच्या आजूबाजूला लहान मुले व नागरिकांची दिवसभर वर्दळ असते,ही धोकादायक पाण्याची टाकी कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडण्याची संभावना असल्याने ती त्वरेने हटविणे क्रमप्राप्त झाले असल्याचे मत डुंबरे यांनी आपला आवाज शी बोलताना व्यक्त केले आहे. टाकी कोसळून अपघात घडल्यास जबाबदार कोणाला धरायचे? असेही ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *