ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयुष प्रसाद यांना निवेदन

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
 १४ सप्टेंबर २०२२

आळेफाटा


ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मंजुर करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या मंजुर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शाखा पुणे जिल्हा यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेमध्ये होणारी १० टक्के भरती बरेच दिवस झालेली नसुन ती तात्काळ भरण्यात यावी.

कर्मचा-यांवर ३५ टक्के पेक्षा जास्त होणा-या खर्चाची तरतूद १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात करण्यात येऊन त्यास मंजुरी मिळावी. प्रत्येक तालुक्यात आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्कार मिळावा तसेच शासण निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीकडुन पन्नास हजार रुपयांचे ग्रजुएटी मिळत असुन ती अतीशय कमी असुन ती दोन लाखांपर्यंत वाढविण्यात यावी. अश्या विवीध मागण्या केल्या आहेत.या वेळी पुणे जिल्हा अध्यक्ष जनार्दन मुळे, उपाध्यक्ष नथू वरे (जुन्नर), ओमप्रकाश भोंडवे,विलास आढारी,अनिल गाडेकर,पुरंदर तालुका मारुती कामठे, पुरंदर सचिव सुजित बोराडे सचिन ठोंबरे व इतर तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *