जेष्ठ कवी बाळासाहेब तोरस्कर यांना डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वश्रेष्ठ शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके

दि. ३० ऑगस्ट २०२१ ओझर :
राष्ट्रीय शिक्षक संचेतनाच्या वतीने देण्यात येणार्या ” डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वश्रेष्ठ शिक्षक राष्ट्रीय सन्मान ” पुरस्काराने ठाणे येथील जेष्ठ कवी, लेखक, पत्रकार व समाजसेवक प्रा. बाळासाहेब तोरस्कर यांना गौरविण्यात येणार आहे. रविवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी प्रीतमलाल दुआ सभागृह, कला विथिका , इंदोर ( म.प्र.) येथे हा सन्मान सोहळा होणार आहे.
राष्ट्रीय शिक्षक संचेतना व हिंदी परिवार इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राधाकृष्णन जयंती अर्थात शिक्षक दिनाच्या निमित्ताने व संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिन तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित श्रेष्ठ शिक्षक संचेतना सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी देशातील १० राज्यातून ५ शिक्षकांना सर्वश्रेष्ठ शिक्षक सन्मान व २५ शिक्षकांना श्रेष्ठ शिक्षक सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
तोरस्कर यांनी देशातील मान्यवरांच्या ह्रृदयांत शिक्षणाबरोबरच मानवी मुल्यांचा विकास करणे आणि संस्कृतनिष्ट जीवन जगण्याची प्रेरणा देण्यासाठी शिक्षणाच्या महायज्ञात ज्ञान तसेच सामाजिक चेतना जागृत करण्याच्या महत्वपूर्ण कार्याला वाहून घेतले आहे. तसेच साहित्यिक,सामाजिक ,सांस्क्रृतिक ,राजकीय , पत्रकारिता व फार्मास्युटीकल क्षेत्रात २५/३० वर्षातील भरीव कामाची दखल घेऊन त्यांची या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आहे .
तोरस्कर हे अनेक सामाजिक , सांस्क्रृतिक व साहित्यिक संस्थांचे संस्थापक व पदाधिकारी आहेत. ते अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे ठाणे विभागीय अध्यक्ष, काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्राचे सल्लागार समिती सदस्य , कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, जायंट्स ग्रुप आॅफ कोल्हापूर मेट्रोचे अध्यक्ष व अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जीवन प्रचारक आहेत .
तोरस्कर यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय सामाजिक व साहित्यिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तोरस्कर यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांंना अनेक नामांकित राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .समाजातील विविध थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *