कॅनॉल मध्ये आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१० सप्टेंबर २०२२

आळेफाटा


आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत बोरी बु (ता.जुन्नर) येथे कुकडी कॅनॉल मध्ये एक स्त्री जातीचा (वय- ६० ते ६५) अनोळखी मृतदेह वाहत्या पाण्यात अढळून आला असून आळेफाटा पोलिसांचा ओळख पटण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मृतदेहाचे वर्णन खालील प्रमाणे आहे. दोन्ही हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या,अंगात ब्लाऊज विटकरी रंगाचा असून गुलाबी रंगाचा परकर घातलेला दिसत आहे. सदरची मयत महिला जर कोणाच्या ओळखीची किंवा परिचयाची असेल तर पोलिसांनी आळेफाटा पोलिसांसी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *