“कविता हा संवेदनशीलतेचा उत्सव!” – राजन लाखे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ ऑक्टोबर २०२१

पिंपरी

राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक, नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक सुभाष चतने यांनी लिहिलेल्या संवेदना प्रकाशन निर्मित मृगजळ कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आज शनिवारी (दि २ ऑक्टोबर ) उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन झाले.

“कविता म्हणजे शब्दांची रांगोळी नसते; तर अंतरात्म्यातून आलेली आरोळी असते!”

यावेळी “कविता हा संवेदनशीलतेचा उत्सव असतो!” असे भावोत्कट मनोगत महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले.

नियो वुड्स हॉटेल, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड येथे काढले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे, शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, सुरेश कंक, प्रकाशक नितीन हिरवे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, “कविता म्हणजे शब्दांची रांगोळी नसते; तर अंतरात्म्यातून आलेली आरोळी असते!” या प्रसंगी कवी सुभाष चटणे यांनी आपल्या मनोगतातून, “१९८३ सालापासून कवितालेखन करताना कवितेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नांची दखल घेऊन काव्यक्षेत्रातील विविध पुरस्कार वाट्याला आलेत. साहित्याने मला जगण्याची एक नवी दिशा दिली; तसेच आज ३९ वर्षांच्या सेवापूर्ती निमित्ताने कुटुंबीय, आप्तेष्ट, साहित्यिक आणि शिक्षकपरिवार यांच्या प्रेमामुळे मनांत कृतार्थपणाची भावना आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली. राजन लाखे पुढे म्हणाले की, “कविता हा संवेदना, व्यथा, वेदना, जाण, जाणीव, उत्साह, चेतना, आशा यांचा संवेदनात्मक संगम असतो. लेखक, कवी, साहित्यिक या संगमातील प्रत्येक बाजू आपल्या लेखणीतून व्यक्त करीत असतो!” या सोहळ्याला सुभाष चटणे यांच्यावर आणि त्यांच्या कवितेवर प्रेम करणारे विविध क्षेत्रांतील रसिक उपस्थित होते. जालिंदर राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अमोल फुंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *