सावरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात…

नारायणगाव,
जुन्नर तालुक्यातील काचळवाडी सावरगाव (ता. जुन्नर) येथे सन १९८० साली उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जिर्णोद्धार सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. येथील कचन विकास मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, आपल्याला जर प्रगती करायची असेल तर शिव विचारांशिवाय पर्याय नाही. मी खूप भाग्यशाली आहे कारण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा १९८० साली काचळवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्थापना झाली. आणि आज माझ्याच हस्ते या स्मारकाचा जीर्णोद्धाराबरोबर शिवपुतळा अनावरण सोहळा साजरा होत आहे.
स्मारक अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने सकाळच्या प्रहरी छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची आणि प्रतिकृतीची चाळकवाडी मधून ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पथकातील लहान मुले व मुलींनी अनेक पारंपारिक मर्दानी साहसी प्रात्यक्षिके सादर केली.
जुन्नर तालुका माजी सैनिक संघातील सर्व माजी सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास परेड करून मानवंदना दिली.
यावेळी व्याख्याते प्रा. गजानन शिंदे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले.
या कार्यक्रमाला अरुण पारखे, सागर कोल्हे, राजन बाळसराफ, रुपेश जाधव, सोपान जाधव, दिलीप खिलारी, माजी सैनिक संघटना जुन्नर तालुका पदाधिकारी, अनंत बोंबले, अनिल मनसुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन कचन विकास मंडळाचे अध्यक्ष बाळशिराम कचन, सचिव श्रीहरी कचन, संघटक दिनकर कचन, व ग्रामस्थांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण दातखिळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *