आता भारत नाही तर ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ मनसे नव्या जोमात

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२५ ऑगस्ट २०२२


राज ठाकरे यांनी पुन्हा शिंदे ठाकरे आणि फडणवीस यांचे नाट्य झाल्यावर एन्ट्री केली आहे… लक्ष आहे महापालिकेच्या निवडणुका … त्यातच एक मोठी घडामोड घडली आहे . मनसे कार्यकर्त्यांनी हिंदूंचा हिंदुस्थानअसा उल्लेख करणारा पोस्टर झळवला आहे. या पूर्वी ही पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी हिंदु जननायक असा राज ठाकरेंचा उल्लेख केला होता. या पोस्टरची चर्चा आता होऊ लागली आहे.आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेची पक्ष बांधणी सुरू झाली आहे. काल राज ठाकरे यांची जाहीर सभा मुंबई येथे पार पडली. राज ठाकरे यांच्या पायच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांची सभा पार पडली आणि आज पुण्यात नाव नोंदणी सुरू त्यांच्या हस्ते सुरू होणार आहे. एकंदरीतच येणाऱ्या निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आहे, असे चित्र पाहायला मिळत आहेत.

आज पुण्यात राज ठाकरेच्या पोस्टरवर आता भारत नाही तर हिंदूंचा हिंदुस्थान,हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक, असे पोस्टर सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरत आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पूर्वीही भाषणाची शैली बदल तमाम जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो बदलू तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो, असा केल्यामुळे मोठी चर्चा रंगली होती. आज पुण्यात राज ठाकरेच्या पोस्टरवर भारत नाही तर हिंदूंचा हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक असा पोस्टर कार्यकर्त्यांनी लावल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. नेमकं आत राज ठाकरे या पुढे काय बोलतील या पोस्टर वरून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *