मराठी नामफलक कारवाई, सर्वोच्च न्यायालयाकडून १८ डिसेंबपर्यंत स्थगिती

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


मराठी नामफलक न लावणाऱ्या दुकानांवरील कारवाई मुंबई महापालिकेतर्फे संथ गतीने सुरू असतानाच दुकानावर मराठी फलक नाही म्हणून कारवाई करण्यास किंवा दंड वसुली करण्यास न्यायालयाने १८ डिसेंबपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंदावलेली कारवाई आता न्यायालयीन प्रक्रियेत रखडणार आहे.

वारंवार मुदतवाढ देऊनही मराठी नामफलक लावण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या दुकानांवर ऑक्टोबरपासून महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून महापालिकेने अशा दुकानांना सात दिवसांच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली. मात्र हा कालावधी उलटल्यानंतरही प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली नव्हती. पहिल्या आठवडय़ात महापालिकेने तीन हजार दुकानदारांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून ही कारवाई थांबली आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईलाच स्थगिती दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *