तासगावात मोठी कार्यवाही : गुटखा व सुगंधी तंबाखू पकडली;

सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली माहिती

तासगांव,प्रतिनिधि राजू थोरात

तासगाव शहरात दि 7 रोजी तासगावहुन विटयाकडे जाणारे
वाहन नंबर mh 10 cr 3575 या लहान पिकअप मध्ये गुटका व सुगंधी तंबाखू पकडली. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितलेकी
तासगाव पोलीस उपाअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या आदेशानुसार व तासगाव पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
तासगाव पोलीस ठाणे हद्दीत साय आम्ही गस्त घालत होतो. दरम्यान गोपनीय बातमीदारा मार्फत एक इसम त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी नंबर mh 10 cr 3575 मधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू वाहतूक करीत आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे सापळा रचून बस स्टँड परिसरात इसम विशाल हणमंत विभूते वय 33 वर्षे राहणार विटा यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला, एम सेंटेड टोबॅको गोल्ड , व्ही 1 सेंटेड टोबॅको असा एकूण 2,71,200 रु चा माल व वाहन किंमत 3,00,000 रु असा एकूण 5,71,200 रु चा माल हस्तगत केला

सदर मालाची तपासणी अन्न सुरक्षा अधिकारी,अन्न व औषध प्रशासन विभाग मार्फत करून अन्न सुरक्षा अधिकारी चनवीर राजशेखर स्वामी वय 31 वर्षे यांचे फिर्यादीवरून भा द वि कलम 188, 272, 273, 328 व अन्न सुरक्षा कायदा कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी विशाल हणमंत विभुते विटा याला तासगांव पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे करीत आहेत.