आळेफाटा येथे बेवारस दुचाकी

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२० ऑगस्ट २०२२

आळेफाटा


एमएच १४ एसी ४६८ ही दुचाकी गेल्या ६ ते ७ दिवसापासून आळेफाटा (ता.जुन्नर) येथील साई ट्रेडर्स या दुकानासमोर कोणी तरी लावली आहे.परत घेण्यासाठी ७ दिवस लोटले तरी कोणी आले नाही. सदर गाडीबद्दल संशय आल्याने या बेवारस गाडीची माहिती दुकानदाराने आळेफाटा पोलिसांना दिली. या गाडीवर श्री रंगदास स्वामी प्रसन्न व जया असे लिहलेले आहे. सदर गाडी शुक्रवार (दि.१९) पासून आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात आहे. कोणाच्या ओळखीची असेल तर त्यांनी खात्री करून घेऊन जावे. आळेफाटा पोलिसांनी आवाहन केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *