आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत अनु जाती व नवबौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळावे

आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत अनु जाती व नवबौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे कडे केली आहे

मोसीन काठेवाडी
१७ सप्टेंबर २०२१

आंबेगाव

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील साहेब आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना भीमाशंकर सह साखर कारखाना} पारगाव येथील गेस्ट हाऊस येथे आंबेगाव तालुक्यतील अनु जाती व नवबौद्ध समाजाच्या वतीने वळसे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व निवेदन देऊन दलित समाजाला आगामी सहकरी संस्थेच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळावे व शासकीय समित्यांवर दलित समाजाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी आशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

सन १९८५ या वर्षा पासून लोकसंख्येच्या अभावी स्थानिक स्वराज्य संस्थेत अनु जाती व नवबौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही त्यामुळे दलित समाज पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणुका पासून जवळ जवेळ ३५ वर्षे वंचित असून या समाजाचा एकही प्रतिनिधी नाही त्यामुळे सहकारी संस्थेत अनु जाती व जमाती साठी एक जागा असते या जागेवर दलित समाजाला प्रतिनिधित्व दिल्यास त्यांना न्याय मिळेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकारी संस्थेत व शासकीय समित्यांवर प्राधान्याने संधी मिळावी अशी अपेक्षा गौतम खरात यांनी व्यक्त केली. जे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत काम करून पक्ष वाढी साठी प्रयत्न करून राष्ट्रवादी पक्षाचा विचार घरोघरी पोहचवतात त्या कार्यकर्त्यांना डावलून इतर लोकांना संधी दिली गेली तर निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होईल असेही मत गौतम खरात यांनी व्यक्त केले.
तरी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी तालुका अध्यक्ष गौतम खरात व मंचर शहर अध्यक्ष संतोष देठे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *