हॉटेलमध्ये शिरून मारहाण: पाच तरुणांच्या विरोधात आळेफाटा पोलिसांत गुन्हा:आरोपी फरार

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२० ऑगस्ट २०२२

बेल्हे


हॉटेलमध्ये शिरून लोखंडी गजाने मारहाण केल्याच्या कारणावरून बेल्हे (ता.जुन्नर) येथील पाच तरुणांवर आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही आरोपी फरार आहेत. आळेफाटा पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार अवि भंडलकर, संकेत शिरतर, ऋषी शिंदे, अभी जाधव, रवी शिरतर (सर्व राहणार बेल्हे,ता.जुन्नर) यांनी कल्याण- नगर महामार्गावर असलेल्या पद्मश्री हॉटेल मध्ये (१६ ऑगस्ट) रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिरून लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीत हाताचा पंजा, डावा खांदा मोडला असून डोक्यात गंभीर दुखापत केली आहे. अशी फिर्याद गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील तान्हाजी लक्ष्मण गुंजाळ (वय-५१ वर्ष) यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून बेल्हे येथील सदर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसून सर्व आरोपी फरार आहेत. या संदर्भातला पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई अमित पोळ करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *