नारायणगाव मध्ये पारंपारिक पद्धतीने गुरुपूजन साजरे

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
३० जुलै २०२२

नारायणगाव


जेष्ठ कथ्थक शिक्षिका नेहा नांगरे यांचे गुरु व नृत्य नुपूर म्युझिक अकॅडमी चे संस्थापक “कथ्थक अलंकार सतीश सकिनालजी” सर यांचे गुरुपूजन पारंपारिक पद्धतीने उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम नारायणगाव येथील जयहिंद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

कथ्थक नृत्यांगना नेहा नांगरे यांच्या वतीने कथ्थक गुरूंची पाद्यपूजा

सतीश सकीनाल गुरुजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गणेशाचे व नटराजाचे पूजन करण्यात आले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्या नंतर साकीनाल गुरूजींच्या शिष्या नेहा नांगरे यांच्या हस्ते गुरूंची पाद्यपूजा करण्यात आली. शिष्यवृंदांचे कथ्थक आणि कथ्थक विषयी प्रबोधनात्मक नाट्य सादर करण्यात आले. तसेच कथ्थक नृत्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे माहिती प्रदर्शन भरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सरपंच योगेश पाटे, तबला वादक संकेत सुतार, भरतनाट्यम आरंगेत्रम डॉ. सुषमा कुलकर्णी, अभिनेते तथा पत्रकार किरण वाजगे, श्रीमती सुमन महादेव गुंजाळ, अंजलीताई खैरे, मुख्याध्यापिका अनघा साने, सौ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री व सौ.नेहा नितीन नांगरे, सर्व शिष्य आणि पालक वर्ग यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ निवेदक मनोज बेल्हेकर यांनी केले. डॉ.अभिलाषा धुमाळ यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *