महारोजगार मेळाव्यात ६५० जणांना मिळाली नोकरी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग  बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारोजगार मेळाव्याला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. मेळाव्यात ६५० जणांना रोजगार मिळाला आहे. कोरोनाच्या काळात नोकरी मिळाल्याने तरुणांनी समाधान व्यक्त केले आणि आयोजकांचे आभार मानले.

एच.पी.पेट्रोल पंप पद्मजी पेपर मिल थेरगाव येथे रविवारी (दि.१३) झालेल्या या मेळाव्याचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर,  मधुकर बाबर,  पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, सुरेश राक्षे, सरिता साने, बाळासाहेब वाल्हेकर, विजय साने, रोमी संधू, नाना काळभोर, युवा सेनेचे रुपेश कदम, राजेंद्र तरस, माऊली जगताप, सामाजिक कार्यकर्ते, अद्योगपती, अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बारणे आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, ,नगरसेवक प्रमोद कुटे ,नगरसेवक निलेश बारणे, शरद हुलावळे ,सुनील हगवणे ,जांलिदर काळोखे   यांनी दिवसभरात मेळाव्याला भेट देऊन शुभेच्छा  दिल्या.

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. युवकांच्या हाताला काम नव्हते. कोरोनानंतर शहरात पहिल्यांदाच रोजगार मेळावा झाला. कोरोनानंतर झालेल्या मेळाव्यात तरुणांनी मोठा सहभाग घेतला. युवा सेना प्रमुख विश्वजीत बारणे यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला अनेक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नोंदणी करणा-यांना पुढील काळात नोकरी देण्याची हमी दिली. पुढील महिनाभर या भागातील गरजू तरुण-तरुणींनी खासदार बारणे यांच्या कार्यालायत नोंदणी करावी. त्यांना पुढील काळात नोकरी दिली जाणार असल्याचे विश्वजित बारणे यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *