जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला आजपासून सुरवात, ४०० खेळाडूंचा असणार सहभाग

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० जुलै २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि चिंचवड येथील नव प्रगती मित्र मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथे  कै. सौ. मनीषा भोईर विरंगुळा केंद्रामध्ये पार पडला.


या उद्घाटनप्रसंगी महापालिकेचे उपआयुक्त रविकिरण घोडके, क्रीडाधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवी, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे समितीचे सचिव नंदू सोनवने, सहसचिव रावसाहेब कानवडे, खजिनदार प्राची जोशी, सहखजिनदार सुदाम दाभाडे, स्पर्धा व्यवस्थापक हर्षवर्धन भोईर, अविनाश कदम, नंदकुमार साने, विनोद देसाई, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यासह खेळाडू, महापालिका कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.


या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन २९ ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले आहे. प्रेमलोक पार्क येथील कै. सौ. मनीषा भोईर विरंगुळा केंद्रात सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत पार पडणार आहेत.  पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिक अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण ४०० खेळाडू सहभागी होणार असून विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीसे तसेच स्मृतीचिन्हे  देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने कळविण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *