आळेफाटा ते अवसरी फाटा दरम्यान महामार्गावरील खड्डे बुजविण्याबाबत मनसे जुन्नर कडून चाळकवाडी टोलनाक्यावर मोर्चा

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
२५ ऑक्टोबर २०२१

ओझर


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जुन्नर तालुक्याच्या वतीने चाळकवाडी येथील टोलनाक्यावर टोलनाका बंद करणेबाबत आंदोलन करण्यात आले.

आळेफाटा ते अवसरी टोलनाक्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून व काही ठिकाणी रस्त्यांची अर्धवट कामे असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी व अपघात होतात. वारंवार याकडे पाठपुरावा करूनही त्याची योग्य दखल घेतली जात नव्हती अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जुन्नर विभागाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद भाऊ पाटे यांनी सांगितले. प्रवाशांकडून टोल आकारून देखील त्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो.

तसेच सर्व्हिस रोडची अवस्था बिकट झाली असल्याने अनेकदा कळंब ,नारायणगाव, अवसरी याठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होती. प्रवाशांना टोल देऊनही जर अशी मानसिकता असेल तर त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो.जर येत्या आठ दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने महामार्गावरील खड्डे बुजविले नाही तर चाळकवाडी येथील टोलनाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बंद करण्यात येईल असा सज्जड इशारा यावेळी मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दिला.

MNS district vice president Makrand Pate's letter to Chalakwadi toll manager
मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांचा चाळकवादी टोल व्यवस्थापकांना पत्र

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *