जिद्द बाळगणाऱ्या ३१४ अपंगांना आमदार लक्ष्मण जगताप व बंधू शंकर जगताप यांचा मदतीचा हात ; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२९ जुलै २०२२

पिंपरी


कुणाचा अपघातात, तर कुणाचा गंभीर आजारामुळे पाय किंवा हात निकामी झालेला. कुणी अपंगत्वच घेऊन जन्माला आलेलं. आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचे नशीब वाट्यास आलेले. मात्र अशा अवस्थेतही जगण्याची, काही मिळवण्याची जिद्द या अपंगांमध्ये आहे. अशा जिद्द बाळगणाऱ्या अपंगांचा आधार बनून त्यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचे सत्कर्म आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि त्यांचे बंधू भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी चालविले आहे. या सत्कर्मातूनच जगताप बंधूंनी शुक्रवारी (दि. २९) आयोजित शिबीरात ३१४ अपंगांच्या आयुष्यात आनंद फुलविला. त्यांना कृत्रिम हात व पायाचे (जयपूर फूट) तसेच व्हीलचेअर आणि ट्राय सायकलचे मोफत वाटप केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या पुढाकाराने चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने पिंपळेगुरवमध्ये हे शिबीर घेण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या शिबीराला शंकर जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंगोळकर, बाबा त्रिभुवन, माऊली जगताप, महेश जगताप, गोपाळ माळेकर, नवनाथ जांभुलकर, शिवाजी कदम, अमर आदियाल, विनोद तापकीर, योगेश चिंचवडे, शेखर चिंचवडे, संजय मराठे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे, निर्मला कुटे, उषा मुंढे, कोमल गौंडाळकर, राणी आदियाल, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.