पिंपळवंडी बंगलावस्तीत मकर संक्रांत उत्साहात साजरी

दि. १७/०१/२०२३
रोहित खर्गे : विभागीय संपादक
पिंपळवंडी, बंगलावस्ती

पिंपळवंडी, बंगलावस्ती : मकरसंक्रांत सण महिलांसाठी मोठा आनंदाचा. या दिवसापासून महिलांचे हळदीकुंकू समारंभ सुरू होतात. मकरसंक्रांत ते रथसप्तमी असा या हळदीकुंकवाचा कालावधी. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा. या दिवशी सौभाग्यवती महिला सुगड पूजा करून देवीला आणि एकमेकींना ओवसून खऱ्या अर्थान हळदीकुंकवाचे वाण देतात.

पिंपळवंडी येथील बंगलावस्ती या ठिकाणी महिलांसाठी दरवर्षी प्रमाणे मकरसंक्रांत निमित्ताने हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी महिलांचे आरोग्य, आहार आणि व्यायाम या विषयावर डॉ. मनाली चाळक यांनी व्याख्यान पर हितगुज केले. महिला ही एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते. सगळ करताना ती मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. थोडासा वेळ तिने स्वतः द्यावा. सगळ्या जबाबदार्‍या पार पाडत तिने आपले आरोग्य ही सांभाळणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. पद्मावती महिला मंडळ यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले. थंडीचे दिवस असल्याने महिलांना वाण म्हणुन स्टोल चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला तब्बल १७० महिलांनी वेळ काढून हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *