कामिका एकादशी निमित्त श्री क्षेत्र आळे येथील रेडा समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२५ जुलै २०२२

आळेफाटा


आळे (ता.जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिरात कामिका एकादशी निमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी दिवसभर १२ ते पंधरा दिंड्या या ठिकाणी आल्या होत्या. हरी किर्तन, हरिपाठ, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर होती.रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते.

दोन वर्षे कोरोनाच्या काळामध्ये या एकादशीला भाविकांना येता आले नाही. त्यामुळे यंदा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे लांबच लांब दर्शन रांग लागली होती. समाधी मंदिर फुला फळाफुलांनी सजवले होते.आलेल्या भाविकांसाठी सकाळचे अन्नदान राजेंद्र जाधव (आळे) दुपारचे शिवाजी आहेर (घरगाव) तर संध्याकाळच्या पंगतीचे अन्नदान बारशिकर राजुरी, माळेगाव पठार, डोंगरवाडी, काटाळवेढे या गावांना केले. देवस्थानची आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या दिंडीचे शनिवार दि.२३ रोजी देवस्थान मध्ये आगमन होऊन सांगता झाली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *