कान्हे फाटा येथे रेल्वेखाली सापडून महिलेचा मृत्यू

दि. १२/०१/२०२३
वडगाव मावळ

 

वडगाव मावळ: कान्हे फाटा येथे रेल्वे स्टेशनजवळ बुधवार ११ जानेवारी रोजी धावत्या रेल्वेखाली सापडून सुमारे ६० वर्षे वयाच्या एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कान्हे फाटा रेल्वे स्टेशन R. K.M. No १५२-३७ जवळ ही घटना घडली. मृत महिलेचे वय अंदाजे ६० वर्षे असून तिचे वर्णन अंगाने मजबूत, रंगाने गोरी, उंची पाच फूट, नाक सरळ, चेहरा गोल, केस काळेपांढरे असे आहे. तसेच महिलेच्या अंगात तांबड्या रंगाचा ब्लाऊज आणि भगव्या रंगाची साडी आहे.

या मृत महिलेबद्दल कुणाला माहिती असल्यास किंवा तिचे कुणी वारस असल्यास, पोलिस हवालदार प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *