आळेफाटा पोलिसांना सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार प्रदान

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१८ जुलै २०२२

आळेफाटा


आळेफाटा (ता.जुन्नर) येथील पोलीस स्टेशनला जून २०२२ चा सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार मिळाला असून पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट तपास करून गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत केल्याने हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते नुकतेच पुणे येथे संपन्न झाले.


पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा पोलिसांनी मागच्या महिन्यांमध्ये ४५ मोटरसायकली व सोने लुटणाऱ्या टोळीचा पडदा पडदाफास करून एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.त्याचप्रमाणे मे महिन्यात बेल्हे येथील वैष्णवी मल्टीस्टेट मधून व इतर ठिकाणाहून चोरी गेलेले ३४० ग्रॅम सोन्याचा तपास करून आरोपींकडून २२ लाख ५८ हजार रुपयांची मालमत्ता पोलिसांनी मिळवली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आळेफाटा पोलिसांना हा पुरस्कार देण्यात आला असल्याने आळेफाटा पोलीस टीमचे जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *