जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद च्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतीकात्मक पायीवारी दिंडी सोहळ्याचे आयोजन

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी 
२५ जुलै २०२२


पुणे जिल्ह्यातील शालेय शिक्षण व इतर शालेय कलाकृर्ती यामध्ये अग्रगण्य समजली जाणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद (ता. जुन्नर )च्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिकात्मक पायीवारी दिंडी सोहळा याचे सालाबादाप्रमाणे रविवार दि 24 जुलै रोजी आलेल्या कामिका एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून तसेच काही विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी या रूपात वेशभूषा करून त्यांनी पायीवारी दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला.सदर संकल्पना शालेय शिक्षण कमिटी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डी बी वाळुंज, तसेच मुख्याध्यापक सुनील ठिकेकर सर तसेच सर्व वर्गशिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले. आपली पारंपारिक वारकरी सांप्रदायाची परंपरा याचे प्रत्यक्ष शिक्षण व विद्यार्थ्यांमध्ये विठुरायाविषयी भक्तीभाव दृढ व्हावा या कारणाने कामिका एकादशीचे औचित्य साधून प्रतिकात्मक पायीवारी दिंडी सोहळा याचे आयोजन करण्यात आले.

शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला.यामध्ये पायी वारी दिंडी सोहळा बरोबरच फुगडी व मानाचे समजले जाणारे ऐतिहासिक रिंगण सोहळा विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात याची देही याची डोळा अनुभवला.ज्ञानोबा माऊली तुकाराम,जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी मोक्षधाम मंदिर,वडगाव आनंद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे टाळ मृदुंग वाजवीत विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेतले.शिवाय यावेळी भजनी मंडळ मार्फत भजन आयोजित करण्यात आले.शिवाय शिक्षक आणि पालक यांनी दिंडी संदर्भात आपाआपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार, सदस्य सतिश भिंगारदिवे, व आदि सदस्य त्याप्रमाणेच वारकरी संप्रदायातील हरीनाना देवकर, रघुनाथ पादिर, चव्हाण महाराज, नाना चाळक, रमेश देवकर, शांताराम गागरे, विठ्ठल गडगे, बाबुराव पादिर, शांताराम देवकर, शाळेचे मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, सहशिक्षका वृषाली कालेकर, मनिषा ईले, ताजणे-कुदळे तसेच फार मोठ्या संख्येने पालक देखील उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *