रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेक्षाध्यक्षपदाचा राजीनामा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२४ मार्च २०२२

मुंबई


मुंबईमधील पक्षकार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द करून राजीनामा मंजूर करावा अशी विनंती त्यांनी पाटील यांच्याकडे केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड झाल्यामुळे त्यांनी महिला संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षपदाची धुरा त्यांनी चांगल्याप्रकारे सांभाळली होती. पाच वर्षांपूर्वी चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांनी त्या संधीचे सोने करत निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र भर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर भाजपच्या विरोधात “शिव स्वराज्य यात्रा ” झाली त्यावेळी पहिलेच भाषण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्याचा योग आला. अतिशय आक्रमकतेणे भाजप वर हल्लाबोल करत पहिल्याच सभेत ग्रामीण भागातील जनतेचे मन जिंकले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.

त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार राज्यभर केला. त्यात त्यांनी मुद्देसूद प्रचार करत जनतेचे मन जिंकले. पक्षात त्यांचा वेगळा दबदबा निर्माण केला म्हणूनच त्यांना महत्वाचे समजले जाणारे महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. राष्ट्रवादी पक्षात ‘एक व्यक्ती एक पद’ असा नियम असल्याने हा राजीनामा दिल्याचे बोलले जाते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *