दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे महागाई नियंत्रित राहील – सुप्रिया सुळे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२३ मार्च २०२२

दिल्ली


दिवसेंदिवस महागाई चा भडका वाढत चालला आहे. घरगुती गॅस, डीझल, पेट्रोल यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यावर आज सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजप विरोधात हल्लाबोल केला.

जेव्हा निवडणूका असतात तेव्हा केंद्रसरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्रसरकार तिकडे व्यस्त राहिल परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत अशी टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली.लोकसभेत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज मांडला.

केंद्रसरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमत देऊन विजयी केले. पण निवडणूका संपताच केंद्रसरकारने पेट्रोल,डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली आहे असा आरोपही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *