रोहित पवारांचं क्रिकेटमधील योगदान काय ? नितेश राणेंचा कहीं पे निगाहे कहीं पे निशाना ?

दि.०९/०१/२०२३
मुंबई


मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य आणि अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी रोहित पवार यांच्या निवडणीनंतर आनंदोस्तव साजरा केला जात आहे. विविध राजकीय नेत्यांनी रोहित पवार यांच्या निवडीवर शुभेच्छा दिल्या आहे. पण भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी खास ट्वीट केले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया. अशा आशयाचे ट्विट केलं आहे. रोहित पवार यांचे आजोबा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहिले आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवनियुक्त रोहित पवार यांच्या निवडीवर आमदार नितेश राणे यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधत रोहित पवार यांना कोपरखळी लागावली आहे. राणेंच्या टीकेवर रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *