अखेर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॅा. कैलास कदम यांची वर्णी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
ऑक्टोबर २०२१

पिंपरी

अगदी निवडणुकीच्या तोंडावर कितीतरी दिवस वाऱ्यावर असलेल्या पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसला अध्यक्ष भेटल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहेर उमटली. एका सामन्य कामगाराच्या कुंटूबातील कदम यांचा जन्म एच.ए. हॅास्पीटल पिंपरी येथे झाला, शिक्षण एच.ए. स्कूल येथे इंग्रजी माध्यमतून झाले, कदम यांच्या नेतृत्वात १९९७ साली पहिली महिला बिनविरोध नगरसेविका निवडून आणली गेली, २००७ साली झालेल्या पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत कदम यांच्या वहिनी सौ.निर्मलाताई कदम या नगरसेवक म्हणून निवडून आल्या.
पुढे २०१२ साली ते स्वतः व त्यांचे बंधू हे वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले.

पुढे कदम यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्या पदांवर काम केले, ते इंटक चे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत त्यांनी कामगार क्षेत्रात अतिशय भरीव काम केले आहे. अनेक ठिकाणी पगारवाढ करार, बेरोजगार युवकांना रोजगार देणे, कामगारांना नोकरीत कायम करणे, परदेशात विविध देशांमध्ये कामगार परिषदांना भारताच्या वतीने प्रतिनिधीत्व केले आहे. त्याच बरोबरीने त्यांनी कोकणातील असंख्य बांधवांना एकत्र करून पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोकण विकास महासंघाची स्थापना केली.

एका कामगार नेत्याला काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देत काँग्रेस नेतृत्वाने या औद्योगिक नगरीत कामगार व काँग्रेसचे संयुक्त समीकरण करून कौशल्यपुर्ण निर्णय घेतला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पिंपरी चिचंवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निवडीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडी बाबत कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत.बातमी समल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद वेक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *