ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२४ मे २०२२

मुंबई


ओबीसी आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण मिळायला हवे हाच प्रयत्न सरकारचा आहे अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

शरद पवारसाहेब हे अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि खासदार ब्रिजभूषण हेही सदस्य आहेत त्यामुळे मनसेने जो फोटो ट्वीट केला आहे त्याचा राजकारणाशी काही संबंध लावू नये असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यसभा उमेदवाराबाबत पत्रकारांनी विचारले असता या सगळ्या प्रक्रियेत मी नाही त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

औरंगजेब व समाधी हा या वेळेला विषय काढून अस्वस्थता वाढवली जात आहे. मशिद वाद निर्माण करुन अस्थिर वातावरण करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु कोण कृती करत असेल तर पोलीस नक्की कारवाई करतील असा स्पष्ट इशारा देतानाच काहीजण नवनवीन क्लृप्त्या काढून वातावरण गढूळ करण्याचे काम करत आहेत असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

पहिल्यापासून हेच सांगत आहोत. की नवाब मलिक यांना गुंतवण्याचा प्रकार होत आहे. नवाब मलिक यांनी बरीच वर्षे सार्वजनिक जीवनात काम केले आहे. नवाब मलिक हे निर्दोष आहेत असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *