भोसरी ते शिवजन्मभूमी जुन्नर पीएमपी बस सेवा सुरू

अतुल परदेशी
मुख्य संपादक
११ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


भोसरीतील बस टर्मिनल ते शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महारात पुतळा, जुन्नर या मार्गावरील पीएमपीएमएल बस सुविधेचे लोकार्पण उत्साहात करण्यात आले. त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या किल्ले शिवनेरीला जाण्यासाठी शिवभक्त आणि पर्यटकांना आणखी एक सुविधा निर्माण झाली आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, जुन्नर चे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी किल्ले शिवनेरीला जाणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी. याकरिता पीएमपीएमएल प्रशासनाकडे भोसरी ते जुन्नर अशी बस सुविधा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता. पीएमपीएमएल प्रशासनाने आता ही सुविधा सुरू केली आहे.

Bhosari to Shivjanmabhoomi Junnar PMP bus service started
भोसरी ते शिवजन्मभूमी जुन्नर पीएमपी बस सेवा सुरू

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये श्रेयवादावरून जुंपली

भोसरीतील बस टर्मिनल ते जुन्नर या बस सुविधेचे लोकार्पण शुक्रवारी दि. ११ फेब्रुवारी सकाळी करण्यात आले. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, भाजपाच्या नेत्या आशा बुचके, पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यासह पीएमपीएमएल चे अधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLA Benke and Ashatai Buchke supporters face off.
आमदार बेनके आणि आशाताई बुचके समर्थक आमने सामने.

आमदार बेनके आणि आशाताई बुचके समर्थक आमने सामने

जुन्नर याठिकाणी पीएमपीएमएल बस चे आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप च्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. अखेर ढोल ताशांच्या गजरात बस शिवनेरी गडावर पोहचले. दोन्ही पक्षांमध्ये जरी श्रेयवादाची लढाई सुरू झाली असली तरी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर जगभरातून असंख्य शिवभक्त जुन्नर येथे येत असतात मात्र मागील काही दिवसांपासून एस. टी कर्मचारी यांचा संप सुरू असल्याने जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांमध्ये घट झाली होती, तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड मधील अनेक व्यवसायिक, नोकरी करणारे कामगार, विद्यार्थी यांना या ना त्या कामानिमित्ताने भोसरी, पिंपरी – चिंचवड, पुणे येथे येणे जाणे असल्याने त्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता जुन्नर चे आमदार अतुल बेनके, भोसरीचे आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या पीएमपीएमएल बस मागणीला अखेर यश आले असून ११ फेब्रुवारीपासून ही बस सेवा सुरू झाली असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *