रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ फेब्रुवारी २०२२
मावळ
अनेक वर्षे प्रतीक्षेत असणारी बैल गाडा शर्यत आज शासनाच्या नियम व अटींचे पालन करून मराठमोळ्या व शेतकऱ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत. आणि आज पुन्हा एकदा मावळच्या घाटात भिररररररर चा आवाज मावळात हिंदकेसरी बैलगाडा घाट नाणोली, मावळ येथे घुमणार. आज ११ फेब्रुवारी व १२ फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यतीची पहिली बारी मावळमध्ये होणार असल्याने बैलगाडा शैकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय बैलगाडा संघटना मावळ आणि मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या बैलगाडा शर्यतीसाठी उत्तम असे घाटाचे काम झालेले आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. या पाहिल्या बैलगाडा शर्यतीसाठी शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शर्यतीसाठी घवघवीत बक्षिकांची लयलूट होणार आहे पहिल्या क्रमांकात येणाऱ्या प्रत्येक बरीस एक मोटार सायकल बक्षीस देण्यात येणार आहे.. द्वितीय क्रमांक येणाऱ्या बरीस रोख १ लाख ५१ हजार रु आणि आतून येणाऱ्या बारीस अर्ध्या टोळ्यांची सुवर्ण अंगठी बक्षीस देण्यात येईल. तृतीय क्रमांक १ लाख रु रोख आणि आतून येणाऱ्या बारिस ५ ग्रॅम ची सुवर्ण अंगठी, चतुर्थ क्रमांकास ७५ हजार रु रोख आणि आतून येणाऱ्या बारीस ५ ग्रॅम ची सुवर्ण अंगठी बक्षीस असणार आहे . घाटाचा राजा ठरणाऱ्या बारीस १ तोळ्याची सुवर्ण अंगठी असणार आहे.

या शर्यतीचे आकर्षण फायनल सम्राट होणाऱ्या बारीस प्रथम बारीस ५१०००, द्वितीय बारीस ३१००० तृतीय बारीस २१००० अशा रोख बक्षिसांची लयलूट असणार आहे.या स्पर्धेदरम्यान अखिल भारतीय बैलगाडा संघटना पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.गाडा टोकन पद्धतीनेच सोडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.