मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले त्याचा त्रास संजय राऊतांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली – आशिष शेलार

२९ डिसेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुराता रेशमीबागेतील संघ कार्यलयास भेट दिली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले त्याचा त्रास श्रीमान संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली. काँग्रेस, नवाब मलिक, अस्सलम शेख यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच! असं शेलारांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

हिंदूना सडके म्हणणारा सर्जिल उन्मानी तुम्हाला प्रिय, दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाव ठेवणारे, रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके अशा शब्दांत आशिष शेलारांनी टीका केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *