तृतीयपंथीसाठी उद्या मतदार नोंदणी शिबीर

०५ डिसेंबर २०२२

पुणे


तृतीयपंथींसाठी मंगळवारी दि. ६ सकाळी ११ वाजता मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २१३ हडपसर मतदारसंघातर्फे हडपसर येथील क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या या शिबिराचा लाभ सर्व तृतीय पंथीयांनी घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांनी केले आहे. सदर शिबिरासाठी मतदार नोंदणी अधिकारी बालाजी सोमवंशी आणि नायब तहसीलदार राजेश कानसकर उपस्थित राहणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *